Monday, March 25, 2019

खिडकीतल जग

खिडकीतुन दिसणारे सुंदर जग ,
खिडकी बाहेर जाणाऱ्यांना,
विचारा कशी भ्रांत होती जगण्याची,

मिळवायचा अट्टहास कितीही केला,आणि कितीही
आपटून घेतलं ना तरीही ,
खिडकीतल जग खिडकीतूनच चांगलं वाटते,

आणि परतून आलेलं पाखर ,स्वस्थ नसतात बसत,
पुन्हा किमान प्रयत्न तरी करतात,#papilon
पडून राहत नाहीत ,
त्यांचा रक्तातच असते ,गरुडासारखी झेप घ्यायची ऐपत ,
आभाळाचा वर उडायच कळत,
तिथे राहायला आणि जगायला जागा नसते,
चला करूया तयारी आता "उड्डाणाची"

#papilon

वपुं काळे जन्मदिवस

पार्टनर .....


लिहायला उशीर झाला कारण
कणभर पोटासाठी , मनभर
काम करण्यात दिवस निघून गेला ,
आणि तुमच्यावर लिहायला , मी कोणी
खूप मोठा , लेखक नाहीये,

पण एवढी सकारात्मकता आणि साधे पणा असून देखील
तुम्ही विचार करण्याचा एवढ्या उंच पातळीवर नेऊन सोडता
यातच सगळं आल
तुम्हाला जसा पार्टनर भेटला ना तसा ,
तसा प्रत्येकालाच भेटत असतो
पण त्याला सांभाळायची वाढवायची ताकत सगळ्यांमध्ये नसते
म्हणून तर

हे हताश लोक बाकीच्यांना नाव ठेवून मोकळे होतात
कारण  यांची ऐपत नसते पार्टनर ला सोबत ठेवायची
पार्टनर चंचल असतो अस वाटते कधी कधी
पण तोच खरा आहे ...#papilon

कारण त्याला गरीब, श्रीमंत,
लहान मोठं नाही कळत,
समाजाची कुठलीच रेषा त्याला अडवू शकत नाही
तो जस जस वाढतो ना तसा तसा प्रगल्भ होत जातो
न थांबता आणि कोणाचा आयुष्यात न डोकवता
तो फक्त व्यक्त करण्यासाठी च येतो
तुमचा या जन्मदिनी मी एवढीच प्रार्थना करू शकतो की
प्रत्येकाला त्याचा पार्टनर भेटावा...



 #papilon

पिछले साल वाला प्यार

पिछले साल के कुछ रंग मैने आज भी संभाळ के रखे है
यादो के पने पे कुछ पॅराग्राफ युही छोडे है
मुझे याद है ओ सारी बाते जो तुम सिर्फ मुझसे करती थी.
हर शाम घंटो तुम सिर्फ मुझसे बात करती थी

तुम्हारी हर बचकानी बाते मुझे याद है,
हा मुझे तुमसे आज भी उतना ही प्यार है

हा जो छोडे है कुछ पॅराग्राफ ओ
इसलीये छोडे है की,
 कुछ बाते तुम्हारी,
कुछ बाते मेरी  थी,
 बस जो हमे पुरी करणी थी..
#papilon
वादे किये थे जो तुमने संग मेरे
ओ भुलुंगा कैसे ,
रंग लगाये जो तुमने इशक के
उन्हे दिलसे निकालू तो कैसे
हा तुमने मुझे दि हुई घडी आज भी
कलाई पे पहनता हू मै
अक्सर तन्हाई मे, बाते करता  हू उसिसे..
 पुछता हू उसिसे
तू लौट के आती क्यू नही...

बैठ जाता हू मै अक्सर जहाँ मिलते थे हम
धुंडति है तुझे ही नजर ,
चलो कुछ वक्त के लिये तो आवो
जो तुमने दिये थे रंग पिछले
साल मुझे उन्हे ले जाणे तो आवो
#papilon

Sunday, March 24, 2019

पब जी शाप की वरदान?

पब जी

  1. शाप की वरदान?



पॉकेमौन ,ब्लु व्हेल नंतर
पबजी या गेम ची क्रेझ आता पूर्ण भारतात पोहचलीय,
पण कुठल्या ही गोष्टीची आशियोक्ती विनाशाकडेच घेऊन जाते,
वाढत्या दुष्परिणामामुळे
चीन ने नुकतीच या गेम वर बंदी घातली आहे .

आपण गेम का खेळतो ?
रोजच्या रुटीन आयुष्यापासून थोडासा ब्रेक घेण्यासाठी,
कंटाळा घालवण्यासाठी, रोजच्या समस्या,कटकटी विसरण्यासाठी ,
आणि काही जण ,
वेळ घालवण्यासाठी काहीच
नसल्यामुळे , खेळतात .

मी देखील खेळतो वेळ भेटला की ,
पण मनोरंजनापुरतच ,


पब जि चे साईड इफेक्ट
1) सतत खेळल्यामुळे इतर चांगल्या गोष्टी करता येत नाही,
आणि दिवसाचे काही तास गेम मध्ये वाया घालवणं शहाणपणाचे लक्षण नाहीये

2)सतत गेम खेळणं, त्याचाच विचार करणं ,कुठल्या व्यसनाहून कमी नाही
3) झोप कमी घेणे
4) मुळातच या गेम मध्ये , इमोशनली अटेचमेण्ट होते,
घरच्यांना किंवा मित्रांना वेळ देणं टाळलं जाते.

कृपया लेख आवडला तर नक्की कळवा


Saturday, March 23, 2019

ट्रेलर-पीएम नरेंद्र मोदी


एक काळ होता  पुस्तकांचा जेव्हा चरित्र किंवा आत्मचरित्र
   किंवा  स्वतःचे स्पष्टीकरण देण्यासाठी पुस्तक निघत होती पण
आज तीच जागा सिनेमांनी घेतलीय म्हणल तर अतिशयोक्ती होणार नाही कारण हल्ली , पुस्तकांपेक्षा सगळे
पिक्चर जास्त बघतात, काळाचा महिमाच हा
त्या मुळेच हल्ली कुठली पण गोष्ट लोकांसमोर ठेवण्यासाठी
चित्रपटांच माध्यमाचा जास्त वापर होतोय




मुळात  बॉलिवूड मध्ये 2018/2019 हे वर्ष
बायोपिक  चे वर्ष म्हणून 
नोंद असणार आहे ,
मागचा वर्षी आलेला padman, नंतर sanju
मग the acidental prime minister,
Mg thakarey ,आणि नंतर मनकर्णिका

आणी आता 5 एप्रिल ला येतोय
पिएम नरेंद्र मोदी ,

या पिक्चर विषयी बोलायचं म्हणजे,


20 मार्च ला या पिक्चर चा ट्रेलर रिलीज झालाय
आणि 3 च दिवसात 16 मिलियन लोकांनी हा ट्रेलर बघितलाय

या पिक्चर ची रिलीज ची तारीख 12 एप्रिल ठरविली होती
पण लोकसभा निवडणूक मतदान
11 एप्रिल ला असल्यामुळे ,
या पिक्चर ची तारीख बदलून 5 एप्रिल केलीय ,

साहजिकच नावाप्रमाणे हा पिक्चर माननीय नरेंद्र मोदींच्या
जीवनावर आधारित आहे,
त्यांची भूमिका , विवेक ओबेरॉय पार पाडतायत,
राष्ट्रीय पुरस्कार विजेते उमंग कुमार पिक्चर चे डायरेक्टर आहेत,

निर्माते -संदीप सिंह ,सुरेश ओबेरॉय, आणि आनंद पंडित आहेत

कलाकार - विवेक ओबेरॉय,
                सुरेश ओबेरॉय,
               दर्शन कुमार,                                                               बोमन ईरानी, मनोज जोशी, जरीना वहाब
आणि राजेंद्र गुप्ता  हे आहेत

ट्रेलर बद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहेत
 सिनेमा कसा आहे हे
5 एप्रिल ला कळेलच
...

एकटेपणा

कोणासाठी  किती पण झुरा पण एक वेळ येते
तेव्हा आपलंच पाणउतारा होतो
नसलेल्या गोष्टी आपल्याला वाटत असतात
गैरसमज असतो तो
एवढी आत्मीयता दाखवणं ,
स्वतःहून ओळख विचारणं
फोटो पाठवणं ,फोटो मागणं
खरच वाटते आयुष्यात कोणी येऊच नये
खर खर वाटते , एकटाच बरा,
पण कोणी आलं ना तर हक्काने यावं ,
राहावं ,अधिकार गाजवावा,
पण जाऊ नये ,
चुकतय कुठं माहितेय का,
कोणाला पण आपलं समजन ,
आपलं समजून,बोलणं
जो गॅप असतो ना , अनोळखी पणाचा
तो कव्हर हळू हळू काढणं ,ते जमलं पाहिजे,
नसता मग गैरसमज होतो
की हा अस कस बोलतो म्हणून..

जाऊदे एकटेपणाचा शाप आहे हा
भोगावाच लागणार ...
#papilon

Friday, March 22, 2019

रात्र वैर्‍याची

पहाटेचे 2.13 मिनिट झालेत
जगजीत सरांची गझल
चिठी ना कोई संदेश ...
ऐकत ऐकत.....

रात्रीची भुतं पुन्हा मानगुटीवर बसलीत
हा या वेळेचा परिणाम आहे की ,
गाण्याचा नाही माहीत ,
भूतकाळ आठवतोय
उगाचच,
काही चेहरे आठवतातयत
काही निघून गेलेले, काही सोडून गेलेले
काही मुद्दामूण निघून गेलेत
मला टाळण्यासाठी,
त्यांना आठवत देखील नसेल मी,

काही मात्र माझे आवडणारे ,त्यांना मी आवडत होतो असे पण आहेत लिस्ट मध्ये,

पप्पा,आत्या,काही मित्र,
मैत्रीण देखील,
जे मुद्दामून निघून गेलेत ,त्यांची का
आठवण यावी बर,
त्यांचा मनाने आलेत आणि त्यांचा मनाने निघून गेलेत
थांबवण्याचा विषयच नव्हता,
बळजबरी नाही करू शकत आपण कोणावर
ती त्यांची मर्जी,
पण आज का आठवावेत ते,
कारण ते जेव्हा सोबत होते ना ,
त्यांचा सहवास हवाहवासा वाटत होता
त्यांना देखील,
पण कुठे माशी शिंकली नाही माहीत
त्यांनी जस काढलं ना मला त्यांचा आयुष्यातून,
त्यांना देखील मी विसरायचं ठरवलंय आता,
हो कुठेतरी सोडाव्याच लागतात,
काही आठवणी ,नसता जड होत डोकं
आणि ती भूत काढतात डोकं
आणि खातात मनाला राहून राहून....
आणि ते जे ज्यांना जायचे नव्हते ते
नियतीने नेलं त्यांना दूर केलं माझ्यापासून
आणि जगापासून सुद्धा ,त्यांचा प्रिय व्यक्तीपासून पण
सुद्धा, त्यांना नव्हतं जायचं तरी गेलेत ते ...


मी तर फक्त आठवण काढू शकतो ,
आसव गाळू शकतो ,
ते जिथे गेले तिथे सुखाने राहू दे
म्हणून प्रार्थना करू शकतो
या व्यतिरिक्त बाकी काही नाही  ....


नकार

तुझा काल भेटलेला नकार
उध्वस्त करून गेला सार  विश्व माझं
संपलो वाटलं मलाच मी
कधी ना उभं राहण्यासाठी..
#papilon
प्रेमात पुन्हा ना पडण्यासाठी
आयुष्य न जगण्यासाठी...

देत मी माझ्यावरच मात ..
उभा आज या लेखणी वरती,
नकाराला बनवतोय
तुझा ताकत मी,
विश्वाचे  दार खुलले आता माझ्यासाठी

Thursday, March 21, 2019

हो मी कविता लिहतो

शब्दात गुंफूनी वेदना
मी कविता लिहतो
वार अन्यायाचे झेलूनि
मी कविता लिहतो
#papilon
आठवतो शब्दन शब्द
तिचा तुटलेल्या वचनाचा,
 हेरून वार,
 आसव न गाळता,
मी कविता लिहतो..

स्तुती मिळता फुलतो,
आणि निंदा मिळता
कोपन्यात निजतो,
हा मी कविता लिहतो
हा मी कविता लिहतो ....

कृपया कविता आणी मी लिहलेले लेख
आवडले तर नक्की supscribe करा
कमेंट करा 

होळी ला रंग का खेळतात?

होळी ला रंग खेळायची परंपरा
 श्रीकृष्णाच्या काळात झाली ,
ते आपल्या मित्रांसोबत गोकुळ आणि वृन्दावन
येथे होळी खेळत असे,आणि तिथूनच होळी खेळण्याची
परंपरा सुरू झाली.
या मुळेच भारतात उत्तरेत होळी खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.


आमचे लेख तुम्हाला मेल द्वारे मिळण्यासाठी आताच subsribe करा




Wednesday, March 20, 2019

कशी झाली होळी ची सुरवात

भारतात सणांना खूप महत्व आहे , आणि आपण सगळे जण
होळीची खूप उत्सुकतेने वाट पाहतो ,
पण तुम्हाला माहितेय का होळी ची सुरवात कशी झाली?


या मागे एक प्राचीन दंतकथा आहे
प्राचीन भारतात हिरण्यकश्यपु नावाचा राजा होता ,
त्याच्या मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णू चा खूप मोठा भक्त होता
तो दिवसभर देवाचे नामस्मरण करत असे ,
हीच गोष्ट राजा हिरण्यकश्यपू ला पटत नसे
वेळोवेळी सांगून देखील मुलगा प्रल्हाद ऐकत नसल्याने
कठोर राजाने त्याला मारण्याची योजना केली
आणि हिरण्यकश्यपू ची बहीण "होलिका" ची मदत मागितली
तिला अग्निमध्ये न जळण्याचा वर होता

तेव्हा प्रल्हादला घेऊन ती आगीत गेली
पण भगवान विष्णूचा कृपेने भक्त प्रल्हाद ला काहीही इजा
झाली नाही आणि "होलिका" जळून राख झाली ।
त्या नंतर भगवान विष्णूंनी
नरसिंहाचे रूप घेऊन राजा हिरण्यकश्यपू चा वध केला

आणि याच मूळे वाईट शक्ती जाळून टाकण्यासाठी
होळी साजरी करतात

आमचे लेख तुम्हाला मेल द्वारे मिळण्यासाठी आताच subsribe करा

इथे वाचा
 होळी ला रंग का खेळतात?

कशी घ्यावी या होळी ला काळजी 2019

           Pic credit --avinash masal

ज्याला आपण मराठी मध्ये धुलिवंदन म्हणतो किंवा रंगपंचमी
म्हणतो

तर या रंगपंचमी ला कशी घेणार तुम्ही तुमचा त्वचेची काळजी?

आम्ही घेऊन आलोय तुमचा साठी काही खास टिप्स
रंग खेळायला जाण्याआधी
1-  रंग खेळायला जाण्याआधी स्किन ला सनस्क्रीम नक्की लावा
2- सनस्क्रीम लावल्यानंतर चेहऱ्याला कोल्ड क्रीम लावा
3-  खेळायला जाण्याआधी केसांना शाम्पू कंडिशनर करा आणि तेल लावा,जेणेकरून तुमचा केसांना रंगाने जास्त नुकसान होणार नाही आणि रंग लवकर निघेल
4- हाथा पायांना मोशराईझर क्रीम लावा


रंग खेळून आल्यावर
1- रंग खेळून आल्यावर सुका रंग झटकून काढा
त्याला पाण्याने  धुवु नका गुलाल पाण्याने पसरतो
2-जर ओल्या रंगाने खेळून आला तर अंघोळ थंड पाण्याने करा
3-केसांना माईल्ड शाम्पू ने धुवा आणि कंडिशनर करा
4-तोंडाला माईल्ड साबणाने धुवा जर बेसन आणि दही चा लेप लावला तर उत्तमच
5 -अंघोळ करताना माईल्ड साबणानेच अंघोळ करा
 कपड्याचा साबण किंवा सोड्याचा वापर करू नका
6-अंघोळ झाल्यावर पूर्ण शरीराला मोशराईझर लावा
तुम्हाला आणि तुमचा परिवाराला आमचा तर्फे होळीचा खूप खूप शुभेच्छा
 आमचे लेख तुम्हाला मेल द्वारे मिळण्यासाठी आताच subsribe करा