Tuesday, February 18, 2020

शाळेतली भेट

, अशी अचानक समोर आलीस,
ओळख असून लहानपणापासूनची 
तरी अनोळख्या सारखी वागलीस,
बहाणा होता सारे जुने मित्र मैत्रिणी भेटण्याचा,
पण मी मात्र तुला भेटायलाच आलतो,

माजी विद्यार्थ्यांचा नावाखाली,
जुने प्रेम पाहायला चाललो

बोलणं असं होतं सगळ्यांच,
औपचारिक नुसतं,
ओलावा तो निरागस मैत्रीचा,
कुठे शोधून पण सापडत नव्हता,

एकमेकांचे नंबर देऊन 
सगळ्यांनी काढता पाय घेतला,
बोलणं तर दूर ,
साधा मेसेज पण पुन्हा नाही आला...
अशी होती आमची शाळेतली भेट



 

No comments:

Post a Comment

Name-
Email address-
Message-