एक प्यार का नगमा है ,
मौजोन की रवानी है ,
जिंदगी कुछ भी नही 'तेरी मेरी
कहाणी है,
कहाणी थांबते ,पण जिंदगी नाही
माणस हरवून जातात , पण आठवणी नाही,
आई पूजेची तयारी करत होती,
आज अक्षयतृतीया ना,
गेलेल्या माणसांना आंबे खाऊ घालतात,
मी पपा चा फोटो मांडत होतो , पूजा करण्यासाठी,
अचानक हे शोर पिक्चर मधल गाणं लागलं,
पप्पा च फेवरेट...
रेडिओ वर लागलं ना हे गाणं की
पप्पा लगेच आवाज मोठा करायचे...
मी 'पपा सोबत हा पिक्चर 4 वेळा तरी बघितला,
कस काय बनवतात राव एवढं सुंदर कलाकृती..💓💓💓
कुछ पाकर खोना है,कुछ खोकर पाना है,
जीवन का मतलब तो , आना और जाणा है,
हे म्हणतात एवढं सोपं नाहीये ना पण,
आना और जाना है...
खूप आठवणी असतात ,त्यांचा बरोबर,
अस लगेच नाही मिटत ते ..
खूप गहरी जखम असते ती ..
कधी तरी अस अचानक ती जखम
आठवायला लागते,
डोळ्यातून फक्त आसव येतात,
शब्द नाही फुटत..
आंखो मे समदंर है ,आशाओ का पाणी है
जिंदगी और कुछ भी नही,'तेरी मेरी कहाणी है,
आशेवर तर जगतो आपण सगळे,
पण ती आशाच दूर निघून गेली तर,
ती व्यक्ती नाहीशी झाली तर,
मग काय ,
जायचं तर सोबत जायचं, अस एकट ठेवून नाही दुखवायच,
जगायचं पण सोबत, आणि निघून जायचं सुद्धा,
पुन्हा जन्म घ्यायला, पुन्हा प्रेम करायला,
पुन्हा नवीन कहाणी लिहायला,
पण सोबतच,
हे असं एकट जगणं शाप असतो..
ना जगाचे असतो आपण,
ना आपल्या प्रिय व्यक्तीचे...
तुफान को आना है , आकर चले जाना है,
बादल है ये कुछ पल का, छाकर चले जाना है
हे खरं आहे की तुफान येते आणि जाते,
पण अस खाली हाथ जात नाही ते,
खूप काही घेऊन जाते, सावरणारे सावरतात ,
पण सोप्प नसते रे,
ज्याचा सोबत, आक्ख आयुष्य सोबत
घालायचं ठरलं होतं त्याच अस अचानक निघून जाण..
#जिंदगी कुछ नही 'तेरी मेरी कहाणी है💓💓💓

No comments:
Post a Comment
Name-
Email address-
Message-