आपल्या मराठी कुटुंबामध्ये ,
काही बिजनेस करणार म्हणल ना,
लगेच विरोध चालू होतो,
सुरवात घरच्यांपासूनच होते,
एकतर आपल्याला लहान पणापासूनच हे शिकवलं जाते की
पुढे काय करायचं तर
नोकरी करायची.
मग ती सरकारी असो की प्रायवेट हा विषय वेगळा,
10 वि ला असताना मला आठवतंय की
एका सरांनी सगळ्यांना एक एक करून विचारलं होत ,
की कोणाला काय करायचंय किंवा बनायचं आहे,मला आठवतंय की मी माझं उत्तर होत की
मला '' उद्योजक'' बनायचंय ....सगळे हसले होते
या वर ....
कारण इंजिनिअर बनायचं
किंवा डॉक्टर बनायचं हे उत्तर असत ना
तर कोणी काही म्हणल नसत.
पण उद्योजक...
अररररे...
हे उत्तर अपेक्षित नव्हतं...
आता या गोष्टीला 10 वर्ष झालेत ...
तो पर्यंत पुलाखालून खूप पाणी गेलय.
या आधी प्रयत्न देखील केला होता बिजनेस चा
पण तो फेल झाला ..
१ वेळा नाही
खुप वेळा..
काही चुका झाल्या होत्या
हे आता स्पष्टपणे मान्य करतोय ,
मी आता पुन्हा नवीन काही बिजनेस चालू करायचा विचार करतोय,
जो 1 लाखाचा आत मध्ये करता येईल,
जो बिजनेस एकटा करता येईल,
ज्यात वस्तू लगेच विकल्या गेली नाही तरी
खराब होणार नाही,
ज्याला मार्केट सहज उपलब्ध असेंन,
भविष्य उजवल असेल ,
जो स्वता करता येईल
कोणावर डिफेन्ड राहायची गरज नाही
ज्याला वेळेचं बंधन नाही ,
की रोज 9 ते 5 च्या वेळेत केलं पाहिजे,
मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून,
मार्केटचा अभ्यास करून मला
मला एक बिजनेस दिसला,
जो वर मांडलेल्या सगळ्या गोष्टीत परफेक्ट
बसतो,
मग काय लागलो तयारी ला
माहिती काढायला,
इत पासून इति पर्यंत
आणि हीच माहिती तुमचा सोबत शेअर करतोय,
तुमचा पैकी काही जणांना सगळी माहिती पण
असेन किंवा कोणाला या व्यतिरिक्त देखील माहीत असेंन
ज्याचा उल्लेख मी केला नाही .तर तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा
मी आशा करतो की तुम्हाला देखील आवडेल
तर नक्की कळवा ,
मी टी शर्ट बिजनेस चालू करण्यासाठी चार टप्यात विभागणी केलीय.
ज्यात वेगवेगळी पद्धतीने टीशर्ट प्रिंट चा ऑपशन आहे
आणि त्यात सगळ्या गोष्टींचा विचार करून
खाली पर्याय दिले आहे.
सर्वात पहिले बजेट नुसार तुम्ही बिजनेस चालू करू शकतात
मी इथे 1 लाखाचा आत मध्ये चालू करण्याबद्दल सांगतोय.
आणि जे इतर पर्याया पेक्षा
उत्तम नफा देणार आहे ।

No comments:
Post a Comment
Name-
Email address-
Message-