Monday, April 22, 2019

सगळे भ्रम तुटतात जेव्हा
शून्य हासिल करून बघावे
जेव्हा वाटते ना,सगळे सोबत आहेत
तेव्हा मशानात जाऊन यावे,

किती वेळा रचले मनोरे ,
मनात होते स्वप्न किती,
किती वेळा ढासळले,
पत्याचे बंगले...

मनातच होतीस तू माझी,
स्वप्नातच सापडले
शिंपल्यात मोती,
खरे पाहिले ना जेव्हा ,
फक्त डोळे पाणावले...

शाई संपावी आता,
वही नाही,
शेवट मागतो आता,
पुन्हा माणूस जन्म नाही...

तू होणार नाहीस माझी,
हे माहितेय आता,
व्हावा आठवणींचा पालपाचोरा
राख सुद्धा भेटू नाही....

No comments:

Post a Comment

Name-
Email address-
Message-