एखादी व्यक्ती आपल्याला आवडणं
आणि एकादया व्यक्तीला आपण आवडणं
यात जमीन-आसमानाचा फरक आहे...
आणि एकादया व्यक्तीला आपण आवडणं
यात जमीन-आसमानाचा फरक आहे...
ती कळत नकळत पणे आयुष्यात आली...
- भेट झाली ...
सहवास लाभला...
गप्पागोष्टी झाल्यात ..आवड-निवड शेअर केली..तिला आवडणाऱ्या गोष्टी,
मला पण आवडायला लागल्यात,
तिला आवडणारे ,गाणे ,
हिरो हेरॉईन,
मला पण आवडायला लागलेत,मी वाहत होतो ,
ती वाहवत होती ..मी मरत होतो ,
ती मारत होती...मी जळत होतो,
ती जाळत होती...तिच्या प्रत्येक हा मध्ये,
माझी हा होती...आणि ना मध्ये ना..एकदा बोलता-बोलता ,
मी तिला विचारलं...
मला आवडतेस तू,तीच उत्तर तेच होत,
जे ,
अलमोस्ट 70 टक्के लोकांना मिळते,""आपण फ्रेंड बनून राहुत का"मी नाही कस म्हनणार ,आज तिचा सहवास पण नाहीये,
कधी तरी होते बोलणं...कधीतरी...पण काल जेव्हा
अवकाळी पाऊस पडला ना..तेव्हा खूप येत होती तिची आठवण..
डोळे पाणावले होते खूप...आणि लिहली मग एक कविता...तेवढंच राहिलंय ना आता हातात माझ्या...मी नुसतं झुरायच..
तिने झुरवायच...मी थांबलोय रे तिथेच...काही दिवसांनी येईल कदाचीत तिचा
मेसेज किंवा ,कॉल
नसता टाकेल ती फेसबुक ला
तिच्या लग्नाची पत्रिका,
माझं काय,लिहिन्यापूरती झालीये ना ..
ती ,
बस झालं मला,मला थोडीच भेटणार ना ती,
ती तर दुसऱ्याकोना साठी तरी बनलीये,माझी राणी येणार,
नकीच येणार,बर आता वर जिचा उल्लेख केलाय ,
ती "कितवी"...पहिली,दुसरी, तिसरी,.....
कितवी ...जाऊदे असेल कितवी पण ,पण हिने मात्र पुरती वाट लावलीय.जो मुलगा दारू चा नावाने पण तिरस्कार करत
होता, तो भेटेल तुम्हाला संध्याकाळ झाली की
बार मध्ये....
आक्रोश करत ,
खोटारड्या प्रेमाचा,
खोटारड्या मैत्रीचा,
स्वार्थ जपणाऱ्या आपल्यांचा,....#की_शराब_पिना_सिखा_दिया
No comments:
Post a Comment
Name-
Email address-
Message-